श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीला सरकारने परवानगी द्यावी, पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
Panjaka Munde, Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड (Shree Kshetra Gahininath Gad) (ता. पाटोदा) हे वारकरी संप्रदायाचे आद्य उगमस्थान आहे. नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथ यांची संजीवन समाधी याठिकाणी आहे. त्यांच्यापासूनच वारकरी संप्रदायाचा आरंभ होतो. दरवर्षी या गडावरून वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरला जात असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक समाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली साजरा करावे लागले आहेत. याचदरम्यान, गहिनीनाथ गडावरून पंढरपूरकडे दरवर्षी जाणारी दिंडी रद्द करण्यात आली होती. सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे. तसेच श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीला सरकारने परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा व वारीच्या 125 वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हे देखील वाचा- Sunil Deshmukh To Exit BJP: विदर्भात भाजपला धक्का! माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा घेतला निर्णय

पंकजा मुंडे यांचे ट्वीट-

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. परंतु, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत मोठी घट होत असल्याचे दिसत आहे. यामुळे राज्यातील लॉकडाऊनच्या काही निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीत आणखी सुधारणा झाल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.