Representational Image | (Photo Credits: ANI)

देशभरासह महाराष्ट्रात अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभुमीवर राज्यात ई-पास रद्द आणि राज्याअंतर्गत रेल्वे प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तर नागरिकांना 2 सप्टेंबर पासून रेल्वेचे तिकिट बुकिंग करता येणार आहे. परंतु मेट्रो रेल्वे सुरु करण्याबद्दल अद्याप महाराष्ट्र  सरकारकडून कोणताच विचार करण्यात आला नसल्याचे आता त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत मुंबई लाईन-1 आणि महा मेट्रो ऑपरेशन्स संबंधित ऑक्टोंबर किंवा राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मार्च महिन्यापासून देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे रेल्वे सेवेसह अन्य कामकाज सुद्धा ठप्प झाल्याचे दिसून आले. परंतु आता केंद्र सरकारने मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र देशातील विविध राज्यातील सरकारकडून मेट्रो सुरु करायची की नाही या संदर्भात निर्णय घेतले जात आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र सरकारने मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.(Maharashtra Unlock 4: राज्यात ई-पास रद्द,राज्यांतर्गत रेल्वे प्रवास करण्यास मुभा, Railway Ticket Booking 2 सप्टेंबरपासून सुरु)

दरम्यान, सध्या मुंबई लोकल अत्यावश्यक सेवासुविधांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र सामान्य नागरिकांनी त्यामधून प्रवास करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लोकल पुन्हा कधी सुरु करणार या बद्दल ही कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. दरम्यान, राज्य ससरकारच्या नव्या नियमांनुसार राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करत प्रवासावरील निर्बंध काढल्याची घोषणा केली. नवी मार्गदर्शक तत्वे आजपासून लागू होत आहेत. या नव्या तत्वांनुसार सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. तसेच ई-पासची सक्ती काढून टाकल्यामुळे नागरिकांना मनासारखा प्रवास करता येणार आहे.