Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

Maharashtra Govt Holiday List 2023: सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रांने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर सुट्ट्यांची यादी राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहेत. सन 2023 या ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे एकुण 24 दिवस साार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून बँकांसाठी एक दिवस अधिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन 2023 सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री 18 फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी रविवार, होळी (दुसरा दिवस) 7 मार्च मंगळवार, गुढीपाडवा 22 मार्च बुधवार, रामनवमी 30 मार्च गुरुवार, महावीर जयंती 4 एप्रिल मंगळवार, गुड फ्रायडे 7 एप्रिल शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (हेही वाचा - मुंबई मध्ये BEST Double Decker बस सेवेला आज 85 वर्ष पूर्ण)

याशिवाय, महाराष्ट्र दिन 1 मे सोमवार, बुद्ध पौर्णिमा 5 मे शुक्रवार, बकरी ईद (ईद उल झुआ) 28 जून बुधवार, मोहरम 29 जुलै शनिवार, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) 16 ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबर गुरुवार, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर सोमवार, दसरा 24 ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२12 नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) 14 नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर सोमवार, ख्रिसमस 25 डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.