Police Bharati News: महाराष्ट्रात पोलिस भरती 100 टक्के करण्यात वित्त विभागाची मंजूरी दिलीय. राज्यात तब्बल 17471 पोलिसांची भरती होणार आहे. पोलिस शिपाई, बॅंण्डस्मॅंन, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिफाई व कारागृह शिपाई अशी एकून 17471 पदांची भरती केली जाणार आहे. तर इतर विभांगाना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते.राज्यात गेल्या वर्षी सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरु असताना शिंदे फडणवीस सरकारने सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. (हेही वाचा- मध्यरात्रीनंतर मरीन ड्राईव्हवर बसण्यासाठी पोलिस घेतात लाच ? तरुणाचे ट्विट व्हायरल)
नवरात्रौत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती केली जाणार होती. मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी पध्दतीनं 11 महिन्यांसाठी भरती केली जाणार होती. या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने नवीन भरती होईपर्यंत गृह खात्यानं हा निर्णय घेतल्याचं सरकारने स्पष्ट केले होतो. मात्र, या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबईसारख्या संवेदनशील शहराची सुरक्षा कंत्राटी पोलिसांवर सोपवणं किती योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. कंत्राटी भरतीविरोधात संभाजी ब्रिगेडनं मंत्रालयात आंदोलन केल होतो.जोरदार विरोध झाल्यामुळे सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय मागे घेतला होता.