
Maharashtra Government changes school timings: महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या वेळे बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतील सर्व शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सकाळच्या वेळेत बदल केला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीचे वर्ग सकाळी ९ वाजल्यापासून किंवा त्यानंतर घ्यावे असा शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासनि निर्णयात म्हटले आहे.५ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात याबाबत सुचना राज्यपाल रमेश बैसे यांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत बदल होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहेत.
हा अभ्यासपूर्वक निर्णय स्टेट कौन्सिल फॉर एज्यूकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग एससीईआरटी ने केला आहे. यामध्ये त्यांनी शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांची अभिप्राय मागवली होती. त्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली आणि काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. विद्यार्थ्याच्या झोपेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर आला. विद्यार्थ्यांची झोप पुर्ण होत नसल्याने अभ्यास करण्यात उत्सुकता राहत नाही, असं पालकांचं मत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अभ्यासपूर्वक निर्णय घेतला आहे.( हेही वाचा- शालेय प्रवेशासाठी 'या' राज्यात आधार अनिवार्य नाही)
हा निर्णय राज्यपाल रमेश बैस यांनी निदर्शनास आणलेल्या बाबींना मान्यता देतो. बदललेली जीवनशैली, विविध आधूनिक मनोरंजनाची साधने आणि रात्री उशिरापर्यंत चालू असलेलला गोंगाट आणि शहरी जीवनात चालू असलेली धावपळ लक्षात घेता, पालकांसोबत लहान मुले उशिरा झोपतात, यामुळे त्यांच्या शारिरीक आणि मानिसक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे हे लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शाळांना नवीन वेळापत्रक कधीपासून सुरु करायचे, हे ठरावात नमुद केलेले नाही.