Gautam Singhania and Vijaypat Singhania : रेमंड ग्रुपकडून (Raymond Group) एक चांगली बातमी समोर आली आहे. रेमंड कंपनीचे संस्थापक विजयपत सिंघानिया(Vijaypat Singhania ) आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया (Gautam Singhania )यांच्यातील वाद संपल्याची किंवा संपण्याच्या मार्गावर असल्याची चिन्ह आहेत. तब्बल नऊ वर्षे पिता-पुत्राच्या नात्यात वितूष्ट होते. वाद एवढे चिघळले होते की गौतम सिंघानिया यांनी वडीलांना घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर, गौतम सिंघानीया हे पत्नीपासूनही विभक्त झाले होते. आता, नुकतीच विजयपत सिंघानिया यांनी मुलगा गौतम सिंघानीया यांची घरी जाऊन भेट घेतली. त्याबाबतची माहिती गौतम सिंघानीया यांनी त्यांच्या एक्स (X)अकाऊंटवरून दिली आहे. (हेही वाचा : रेमंडचे Gautam Singhania यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया पासून वेगळे होण्याची घोषणा)
दोघा पिता- पुत्राच्या भेटीचा फोटो गौतम सिंघानिया यांनी एक्सवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आज माझे वडील घरी आले. त्यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे खूप आनंदी आहे.’ 2015 मध्ये विजयपत सिंघानिया यांनी कंपनीची सर्व सूत्र मुलगा गौतम सिंघानियाकडे दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. वादांनी सीमा ओलांडत 2017 मध्ये विजयपत सिंघानिया यांनी मुलाने मला घराबाहेर काढल्याचा आरोप केला. (हेही वाचा : Raymond Group Penalty Case: रेमंड ग्रुपचे सीएमडी Gautam Singhania यांनी भरला तब्बल 328 कोटी रुपयांचा दंड; संग्रहालयासाठी 142 कार आयात करताना चुकवले होते सीमा शुल्क)
त्यानंतर अनेक मुलाखतीत त्यांनी पुत्र प्रेमात आंधळे होऊन बीझनेसची सर्व सूत्रे मुलाला दिल्याबद्दल पश्चताप व्यक्त केला होता. त्यांनी स्वत:कडे काहीच हक्क ठेवले नव्हते. फक्त थोडेफार पैसे ठेवले होते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. एका मुलाखतीत विजयपत सिंघानिया यांनी सुनेबद्दची काळजीही व्यक्त केली होती. गौतम आपल्या पत्नीला बाहेर काढू शकतो, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी देशभरातील पालकांना मुलाला सर्व संपत्ती देण्यापूर्वी विचार केला पाहिजे असा समज दिला होता. मुलांना जे काही द्याल ते आपल्या मृत्यूनंतरच द्या. अन्यथा त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते, असे ते म्हणाले होते.