Lord Ganesha (फोटो सौजन्य - Pixabay)

मुंबई मध्ये प्रामुख्याने सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganpati festival Celebrations) धामधूम असते. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणामध्ये साजरा करण्याचे आवाहन बीएमसी कडून देण्यात आले आहे. सोमवारी बीएमसी ने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाईन सिंगल विंडो अ‍ॅप्लिकेशन सिस्टीम (Single Window System For Mandal Permissions) सुरू केली आहे. पालिकेची वेबसाईट https://portal.mcgm.gov.in वरून गणपती मंडळांना ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. स्थानिक पोलिस स्टेशन आणि ट्राफिक पोलिसांकडून एनओसी दिली जाणार आहे.

बीएमसी पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देत आहे आणि मंडळांनी खड्डेमुक्त मंडप उभारावेत आणि सजावटीसाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरावे यावर भर दिला आहे. उत्सव अधिक लोकाभिमुख आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी, बीएमसीने आतापर्यंत कारागिरांना 907 मेट्रिक टन शाडू माती मोफत दिली आहे आणि 979 शिल्पकारांना मूर्ती बनवण्यासाठी तात्पुरत्या मंडपांसाठी मोफत जागा देण्यात आली आहे.

सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाकरिता मंडप उभारणी परवानगीसाठी एक खिडकी योजना

दरम्यान,मंगळवारी महामंडळाने अनेक गणपती मंडळांमधील स्वयंसेवकांसाठी पर्यावरणपूरक विसर्जन तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक तत्त्वांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण घेतले.

प्रशिक्षणात गर्दी नियंत्रण, आगीच्या घटना, आपत्तींदरम्यान प्रथमोपचार, विद्युत सुरक्षा उपाय, सीपीआर, रुग्ण वाहतूक, आपत्कालीन व्यवस्थापन इत्यादींचा समावेश होता.