Ganeshotsav 2020 (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्रात कोरोनाचे (Coronavirus In Maharashtra) संकट दिवसागणिक अधिक भीषण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मार्च पासूनच सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. हेच संकट आता मुंबईकरांचा आवडता सण म्हणजेच गणेशोत्सवावर (Ganeshotsav 2020) सुद्धा घोंगावत आहे. मुंबईतील बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी यंदा कोरोनामुळे अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याची तयारी दर्शवली आहे. हाच निर्णय पाळून यंदा मुंबईच्या प्रभादेवी (Prabhadevi)  भागातील बालगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सयानी रोडचा राजा यांनी सुद्धा काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून या नियमांविषयी सर्व गणेशभक्तांना माहिती देण्यात आली. यातील मुख्य निर्णय म्हणजे दरवर्षी मोठाल्या मूर्तीच्या रूपात येणारा गणपती यंदा अवघ्या 2 फुटाच्या मिनी बाप्पा स्वरूपात मंडळात आणला जाणार आहे. या मूर्तीचे आगमन- विसर्जन यंदा कोणताही गाजावाजा न करता होईल असेही मंडळाने सांगितले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सयानी रोडचा राजा मंडळ यंदा 2  फुटाची शाडूच्या मातीची गणेशमूर्ती आणणार आहे. या मूर्तीचे आगमन किंवा विसर्जन हे मिरवणूक स्वरूपात केले जाणार नाही. मुख्य म्हणजे यंदा विसर्जन अनंत चतुर्दशीला न करता दिड दिवसांनी कृत्रिम तलावात केले जाणार आहे. यंदा विभागात कोणतीही वर्गणी गोळा केली जाणार नाहीये.Ganeshotsav 2020: परळच्या राजाची गणेशमुर्ती यंदा 23 फुटी ऐवजी 3 फुट घडवणार, मंडळाचा प्रथमच ऐतिहासिक निर्णय

पहा सयानी रोडचा राजा गणेशोत्सव मंडळाची पोस्ट

 

View this post on Instagram

 

योग्य निर्णय ...

A post shared by Dadar - दादर (@dadarmumbaikar) on

दरम्यान, यापूर्वीच असा निर्णय मोठमोठया मंडळांनी जाहीर केला आहे. मुंबईतील प्रसिद्ध वडाळा जीएसबी मंडळाने तर यंदा भाद्रपदात गणेशोत्सव न करता करण्याचा निर्णय घेतला आहे. तर साऊथ मुंबईतील खेतवाडी गणेशोत्सव मंडळाने सुद्धा यंदा छोट्या मूर्ती आणून गणेशोत्सव करणार असल्याची माहिती दिली आहे. अद्याप लालबागमधील गणेशोत्सव मंडळांनी याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही.