Lok Sabha Elections 2019 Phase 1 Voting in Maharashtra: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) साठी आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशात आज 91 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे. आज महाराष्ट्रात विदर्भातील 7 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. यामध्ये गडचिरोली चिमुर (Gadchiroli- Chimur) या भागात नक्षलग्रस्तांच्या कारवायांपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी 4 -5 मतदान केंद्रांमध्ये आयत्यावेळेस बदल करण्यात आला आहे. Lok Sabha Elections 2019: ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून तुमचं मतदान केंद्र कसं पहाल?
कुठल्या मतदान केंद्रांमध्ये झाला बदल?
नाळेकल येथील मतदान केंद्र ढोलडोंगरी येथील माजी पोलिस पाटलांच्या घरी हलवले. लेकुरबोळीचे नवेझरी येथे भिमनखुजीचे गरापती येथे तर आलोंडीचे पिटेसूर येथे हलवण्यात आले आहे. गोडरीचे केंद्र सोनपूर येथे हलवण्यात आले आहे. Lok Sabha Elections 2019 First Phase Poll Live Updates: नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा अधिकार
ANI ट्विट
Maharashtra: IED blast by naxals near a polling booth in Etapalli in Gadchiroli district, no injuries reported
— ANI (@ANI) April 11, 2019
मतदानाच्या पूर्वसंध्येला गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. तसेच आजदेखील कसनसून पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाघेझरी मतदान केंद्राजवळ मतदानावेळी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. मात्र यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
मतदान केंद्र किमान 4-5 कि.मी. दूर अंतरावर हलवल्याने मतदान विस्कळित व संथ गतीने सुरू आहे. विदर्भातील 7 मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 13.7% मतदान झाले आहे. गडचिरोली-चिमूर हा नक्षलवादी भाग असल्याने त्याठिकाणी दुपारी 3 पर्यंतच मतदान होणार आहे.