
गडचिरोली भागामध्ये माओवादी आणि नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. दरम्यान 2 मे दिवशी रामको (Ramko) आणि शिल्पा ध्रुवा (Shilpa Dhruva) या महिला माओवादीची खोट्या चकमकीमध्ये हत्या झाल्याच्या आरोपावरून पुन्हा माओवादी आक्रमक झाले आहेत.
रविवार 19 मे दिवशी माओवाद्यांनी गडचिरोली बंदचं आवाहन केलं आहे. एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली मार्ग, आलापल्ली मार्ग आणि भामरागड मार्ग येथे माओवाद्यांनी गडचिरोली बंदचे बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीमुळे दुर्गम भागामध्ये दहशतीचे सावट पसरलं आहे.
यंदा महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी हिंसक होत पोलिस जवानांच्या गाडीवर हल्ला केला होता. यामध्ये 15 पोलिस जवान आणि एक ड्रायव्हर मृत्युमुखी पडला होता.