FYJC Mock Admission प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल 23 मे नंतर सुरू होणार अर्ज प्रक्रिया
Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

शालेय शिक्षण विभागाकडून 11वी प्रवेशाच्या मॉक अ‍ॅडमिशन फॉर्मच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार याची सुरूवात आज मंगळवार 17 मे पासून होणार होती पण आता त्यामध्ये बदल झाल्याने ही प्रक्रिया 23 मे पर्यंत सुरू होऊ शकणार नाही. यंदा जून महिन्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्ज प्रक्रियेतील पार्ट 2 ची प्रोसेस सुरू होणार आहे.

दोन आठवड्यांपूर्वी शालेय विभागाने एफवायजीसी मॉक फॉर्म फिलिंगची तारीख जाहीर केली होती. मात्र शनिवारी 14 मे दिवशी आता ही प्रक्रिया 23 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. आता मूळ वेळापत्रकानुसार, जून महिन्याच्या सुरूवातीला पार्ट 1 भरला जाणार आहे आणि 20 जून नंतर पार्ट 2 भरला जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra SSC, HSC Results 2022: 10वी, 12वी चा निकाल 10 जूनपूर्वी लागणार; बोर्डाची माहिती .

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर केला जाईल असं गृहित धरून फॉर्म भरण्याचं मूळ वेळापत्रक बनवण्यात आलं आहे. हे वेळापत्रकही अंदाजे बनवण्यात आलं आहे. त्यामध्ये देखील बदल होऊ शकतात.

यंदाच्या 11वीच्या विद्यार्थ्यांबाबत अ‍ॅडमिशन प्रक्रिया सुरळीत पडावी म्हणून शिक्षकांचं ट्रेनिंग झाले आहे.रिजनल ऑफिसमध्येही अ‍ॅडमिशन प्रकियेमधील गोष्टी, शंका दूर करण्यासाठी सोशल मीडीयामध्ये लाईव्ह सेशन घेणार आहेत.

यंदा centralised admissions process (CAP)कमिटीने प्रवेशप्रक्रियेच्या 3 फेर्‍या होतील आणि एक स्पेशल राऊंड होईल. प्रथम येणार्‍यांना प्राधान्य ही फेरी रद्द केली जाणार आहे.