राज्यात 15 ते 31 मे या काळात 6 लाख 68 हजार 645 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात 15 ते 31 मे या काळात 6 लाख 68 हजार 645 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री (Online Liquor) करण्यात आली आहे. आज दिवसभरात राज्यात 63 हजार 962 ग्राहकांना घरपोच मद्य करण्यात आली आहे. यापैकी मुंबई शहर, मुंबई उपनगरात 41 हजार 534 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. यासंदर्भात उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी माहिती दिली आहे. (Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 2487 नवे कोरोना रुग्ण, तर 89 जणांचा मृत्यू; राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67655 वर पोहोचली)

दरम्यान, लॉकडाऊन चारमध्ये राज्यातील दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, राज्यात 7207 मद्यविक्री दुकाने सुरू आहेत. याशिवाय 1 मे पासून 1 लाख 8 हजार 85 ग्राहकांना मद्यसेवन परवाने मंजूर करण्यात आले आहेत. तसेच अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 6964 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी 3197 आरोपींना अटक करण्यात आली असून 18 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (पुण्यात गेल्या 24 तासांत 285 नवे कोरोना रुग्ण, तर 8 जणांचा मृत्यू; जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7750 वर पोहोचला)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन 5.0 सुरू आहे. लॉकडाऊन काळात दारूची दुकाने सुरू ठेवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यामुळे राज्य तसेच केंद्र सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली. परंतु, दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर नागरिकांनी दुकानांसमोर सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन केले. त्यामुळे सरकारने दारूची ऑनलाईन डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली. लॉकडाऊन काळातदारू विक्रीतून सरकारला आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला आहे.