
एकाच कुटुंबियातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील कोरडी परिसरात मंगळवारी दुपारी घडली आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका विवाहित जोडप आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तसेच चौघांचे मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केले. तूर्त स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
धीरज डिंगाबर राणे (वय 42), पत्नी सुषमा धीरज राणे (वय 39), मुलगा ध्रुव धीरज राणे (11), मुलगी लावण्या उर्फ वण्या धीरज राणे (वय 5) अशी मृतकांची नावे आहेत. धीरज हे वानाडोंगरीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाचे विभाग प्रमुख आहेत. तर, डॉ. सुषमा या धंतोलीतील अवंती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. धीरज यांच्या आत्या प्रमिला (वय 65) त्यांच्यासोबत राहत होत्या. मात्र, आज दुपारी झाल्यानंतरही चौघेही खोलीतून बाहेर न आल्याने प्रमिला यांनी धीरज यांना आवाज दिला. मात्र, बराच वेळ झाला तरी, खोलीतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर प्रमिला यांनी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचा एक ताफा घटना स्थळी पोहोचला. यावेळी धीरज, ध्रुव व लावण्या या तिघांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळले. तर, बाजूलाच पंख्याला डॉ. सुषमा यांनी गळफास लावून घेतला असल्याचे पोलिसांना दिसले, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Nanded MNS City President Suicide: 'राजसाहेब मला माफ करा' सुसाईड नोट लिहित मनसेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावार यांची आत्महत्या
राणे दाम्पत्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहे. सुषमा यांनी धीरज,ध्रुव आणि लावण्या यांची मृत्यूनंतर आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या चौघांचे मृतदेह पंचनामा करण्यासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.