Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Nanded MNS City President Suicide: मनसेचे (MNS) नांदेड (Nanded) शहराध्यक्ष सुनील इरावार (Sunil Irawar) यांनी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सुनीर इरावार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफी मागितली आहे.

सुनील इरावार हे नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राहतात. त्यांनी शनिवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी इरावार यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा - Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला पूर; पाणी गावात शिरल्याने 100 गावांचा संपर्क तुटला; पहा व्हिडिओ)

या सुसाईड नोटमध्ये सुनील इरावार यांनी म्हटलं आहे की, 'राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे.’ यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई मला माफ कर. आई, पपा, काका, काकू , मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही सर्व जण मला माफ कराल, अशी आशा बाळगतो,' असंही सुनीलने अखेरच्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण किनवट शहरात खळबळ उडाली आहे.