
देशभर आज धूळवड आनंदाने साजरी झाली. पण या जल्लोषाच्या सणाला मध्ये अपघाताचे गालबोट लागले आहे. धूळीवडीत रंगाने माखलेली चार अल्पवयीन मुलं उल्हास नदी मध्ये रंग काढायला उतरली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ती वाहून गेल्याने सणाच्या दिवशी या भागात शोककळा पसरली आहे. ही चारही मुलं अवघी 15-16 वर्षांची होती. चामटोली जवळच्या पोद्दार गृह संकुलात ती राहत होती.
मृतांमध्ये आर्यन मेदर (15), आर्यन सिंह (16), सिद्धार्थ सिंह (16), ओमसिंग तोमर (15) यांचा समावेश होता. या मुलांचा नदीत बुडून झाल्याने चामटोली परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. स्थानिकांच्या मदतीने चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळता स्थानिक, अग्निशमन दल कर्मचारी, पोलिस घटनास्थळी धावले. सध्या चारही मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
इंद्रायणी नदीतही तिघांचा मृत्यू
ठाण्यात उल्हास नदी प्रमाणेच पुण्यात किन्हई गावाजवळ इंद्रायणी नदीमध्ये बुडून तीन मित्रांचा जीव गेला आहे. Three Drowned in Indrayani: पुण्यात धूळवडी निमित्त इंद्रायणी नदीपत्रात उतरले; तीन मित्रांचा बुडून मृत्यू .
ठाण्यामध्ये मृत चारही मुलं ही दहावीचे विद्यार्थी आहेत. 17 मार्चला दहावीच्या बोर्ड परीक्षेचा शेवटचा पेपर होता. परीक्षा आणि सण यामध्ये सुट्टी आल्याने ही मुलं धूळवड खेळायला आली होती पण त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी 2 ते 2.30 च्या दरम्यानची आहे.