Jyoti Kalani Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे आज निधन
Jyoti Kalani (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे संकट वावरत असताना उल्हासनगर (Ulhasnagar) येथून रायकीय नेत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी (Jyoti Kalani) यांचे आज हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ज्योती यांना सायंकाळच्या सुमारास त्रास जाणवू लागला. ज्यामुळे त्यांना उल्हासनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांनी वयाच्या 65 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उल्हासनगर मतदारसंघातून तीनवेळा विजय मिळवला आहे. परंतु, त्यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. ज्योती कलानी यांनी उल्हासनगरमध्ये आपले चांगले राजकीय वर्चस्व निर्माण केले होते. नगरसेवकपदापासून, स्थायी समिती पद, महापौर त्यानंतर आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने आज ज्योती कलानी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- Eknath Khadse on Devendra Fadnavis: 'विरोधी पक्ष नेता होतो पण असा कुत्र्यामांजराचा खेळ कधी खेळला नाही' एकनाथ खडसे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

हे देखील वाचा-

ज्योती कलानी यांनी उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर स्थायी समिती सभापती, महापौर व आमदार अशी पद त्यांनी भूषवली होती.