Eknathrao Salve Passes Away (Photo Credit: Twitter)

काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे (Eknathrao Salve) यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी चंद्रपुरात (Chandrapur) आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी या मूळ गावी त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथराव साळवे यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू आणि प्रचंड लोकसंग्रह असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने चंद्रपूरची जनता त्यांना नेहमीच स्मरणात ठेवणार आहेत.

एकनाथ साळवे हे केवळ राजकीय नेते म्हणून नव्हेतर नक्षलवाद्यांचे आणि आणि आदिवासींचे वकील म्हणूनही त्यांची ख्याती होती. 1992 साली तत्कालीन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यावर सरकार-नक्षली यांच्यात मध्यस्थी घडवून आत्राम यांची सोडवणूक करण्यात एकनाथराव साळवे यांचा मुख्य वाटा होता. हे देखील वाचा- Ambani House Bomb Scare: API सचिन वाझे जबाब नोंदवण्यासाठी NIA कार्यालयात दाखल

ट्वीट-

याशिवाय, त्यांनी कायदा आणि नक्षलवाद या विषयावर पुस्तक लिहली आहेत. त्यांनी लिहलेली एन्काऊंटर ही कांदबरीने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. साळवे यांच्या निधनावर अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.