Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) मधील रक्षकनगर (Rakshaknagar) भागात काल मध्यरात्री 3 च्या सुमारास आग लागली होती. बिराजदार झोपडपट्टीला लागलेल्या आगीला 12-15 घरं जळून खाक झाली आहे. दरम्यान या आगीचं समजताच अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आले आहे.

सकारात्मक बाब म्हणजे या आगीमध्ये कोणतीच जीवितहानी झालेली नाही. पण अनेक घरं उद्धवस्त झालेली आहे. पहाटेच्या वेळेस आग लागल्याने अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. आग नियंत्रणामध्ये आल्यानंतर मात्र त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पुण्यात लागलेल्या या आगीत आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. त्यांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने लवकरात लवकर मदत करण्यात मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.