Thane: ठाणे शहरातील एका निवासी इमारतीच्या मीटर रूममध्ये रविवारी पहाटे आग (Fire) लागली. याबाबत ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने (आरडीएमसी) माहिती दिली आहे. सकाळी 3.30 च्या सुमारास ग्राउंड प्लस तीन मजली इमारतीच्या मीटर रूममध्ये लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे नागरी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी (Yasin Tadvi) यांनी सांगितले.
या घटनेत 12 वीज मीटर उद्ध्वस्त झाले असून, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आरएमडीसीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. (हेही वाचा - Beed Maratha Reservation: बसेस जाळल्या, रस्ता रोखला; बीडमध्ये तरुणाच्या आत्महत्येमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला)
दरम्यान, आणखी एका घटनेत ठाणे जिल्ह्यातील एका मेडिकल दुकानाला आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरडीएमसीच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सुमारे 14:02 वाजता, केमिस्टला आग लागल्याची माहिती नागरी प्राधिकरणाला मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इंदिरा नगर भागातील लाल बहादूर शास्त्री मार्केटच्या बाजूला असलेल्या पालीवाल डेअरीजवळील एका दुकानाला ही आग लागली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे अग्निशमन दल आणि इतर नागरी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुकानाला लागलेली आग विझवण्याचे काम सुरू केले. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले.