Beed Maratha Reservation: बसेस जाळल्या, रस्ता रोखला; बीडमध्ये तरुणाच्या आत्महत्येमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला
शनिवारी आरक्षणाच्या मागणीसाठी बाहेर पडलेल्या आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. बीड मध्ये तरुणाने मराठा आंदोलनात असताना पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या केली.
Beed Maratha Reservation: महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या घटनाची चर्चा होत आहे. शनिवारी आरक्षणाच्या मागणीसाठी बाहेर पडलेल्या आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. बीड मध्ये तरुणाने मराठा आंदोलनात असताना पाण्याच्या टाकीवर चढला, लोकांनी त्याला समजवण्याचा खुप प्रयत्न केला. असे असतानाही तरुणाने टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर स्थानिक आक्रमक झाले. घटनेची माहिती मिळताच धुळे सोलापूर महामार्गावरील महालक्ष्मी चौकात मोठ्या संख्येने जमाव जमा झाला व त्यांनी आंदोलन सुरू केले.
महामार्गावरून एक प्रवासी बसही लोकांनी अडवली. सर्व प्रवाशी खाली उतरवून बस पेटवून दिली. यावेली अनेक टायर जाळून महामार्गावरील वाहतूर बंद करण्यात आली. आंदोलकांनी बऱ्यात वेळ महामार्ग बंद करण्याची घोषणाबाजी केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी धाव घेतले. लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. बसला आग लावण्यापूर्वी प्रवाशी बस मधून उतरले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
आता पर्यंत मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या सात ते आठ तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे राज्यात नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. बीड येथील एक तरुण मुंबईतील वांद्रे येथील फ्लायओव्हरवरील लॅम्प पोस्टला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बस संपुर्ण जळाली आहे, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी जावून आंदोलनकर्तांना रोखले
(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2023 01:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

