पुणे: कर्वे रस्त्यावरील फर्निचर दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
Fire | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) शहरातील कर्वे रस्ता (Karve Road Pune) येथे असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाला (Furniture Shop) आज (गुरुवार, 26 डिसेंबर 2019) अचानक आग लागली. पुणे शहरातील अत्यंत रहदारीचा आणि वर्तळीचा प्रमुख रस्ता अशी या रस्त्याची ओळख आहे. भर दुपारी घडलल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची धावपळ सुरु झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, दुकानातील वातावर वातानुकीलीत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रनेतून (एसी कंप्रेसर) ही आग भडकली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी पुणे अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा, पुणे: कात्रज ते येरवडा प्रवास विमान प्रवासापेक्षाही महाग; रिक्षाचालकाने प्रवाशाला घातला 4300 रुपयांचा गंडा)

दरम्यान, कर्वे मार्गावर असलेले हे फर्निचरचे दुकान मोठे असून, त्यात फर्निचर आणि त्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू मिळतात. दुकानाला आग लागल्याचे ध्यानात येताच कर्मचाऱ्यांनी दुकानातील हाती लागणारे साहित्य दुसरीकडे स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, युद्धपातळीवर प्रयत्न करुनही सर्व साहित्य स्थानांतरीत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले नाही. महत्त्वाचे म्हणजे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.