Pimpri Chinchwad: सुनेचा छळ केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Harassment | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कौंटुबिक कारणावरून सुनेचा छळ केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) माजी महापौर मंगला कदम (Mangala Kadam) यांच्यासह 5 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सुनेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. दरम्यान, मंगला कदम यांच्यासह त्यांचे पती, मुलगा आणि अन्य दोन जणांविरोधात पोलिसांना तक्रार मिळाली. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी महिलेचा पती कुशाग्र कदम, सासू मंगला कदम, अशोक कदम, गौरव कदम आणि स्वाती कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेला 2011 पासून पती कुशाग्र कदम आणि त्याचे कुटुंबीय त्रास देत होते. तिच्या पतीला गांभीर आजार असल्याचे लपवून ठेवली. त्यानंतर डॉक्टरांशी संगणमत करून याला दुसरा आजार असल्याचे सांगण्यात आले. तसेच फिर्यादीला मुल होण्यासाठी आयव्हीएफ पद्धतीने उपचार केले. या सर्व प्रकारादरम्यान फिर्यादी महिलेला सासरच्या मंडळीकडून सतत मारहाण होत राहिली. त्यानंतर अखेर या त्रासाला वैतागून या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. हे देखील वाचा- Maharashtra Government: महाराष्ट्र राज्य शासनाचा पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय, राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. यानंतर मंगला महापौर यांच्याविरोधात नेमकी कोणती कारवाई केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटननेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.