नागपूर: वडिलांनी DJ च्या तालावर काढली 22 वर्षीय मुलाची अंत्ययात्रा, मृत तरुण होता महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत
DJ Speaker (PTI and pixabay)

कोणत्याही लग्नाच्या वरातीत, आनंदाच्या क्षणी, सोहळ्यात मिरवणुकांमध्ये ढोलताशे वाजलवले जातात, डीजे लावले जातात. मात्र कोणाच्या अंत्ययात्रेला डीजे लावलेला तुम्ही ऐकलं आहे का? पण हे घडलयं नागपूर मध्ये. महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याच्या वडिलांनी डीजे लावून त्याची अंत्ययात्रा काढली. 22 वर्षांच्या प्रणव राऊत ने गळफास लावून आत्महत्या केली होती. नुकत्याच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रणव राऊत हा महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्षेत्रातील प्रसिद्ध खेळाडू आहे. 11 व्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रणवने दिल्लीमध्ये जानेवारी महिन्यात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धात चमकदार कामगिरी केली होती. त्याला सुवर्णपदकही जिंकले होते. असे असताना त्याने 21 फेब्रुवारीला सकाळी साडे नऊच्या सुमारास शास्त्री स्टेडिअममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. प्रणवच्या मृत्यूची खबर ऐकताच त्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. धक्कादायक! 'Pubg' गेममधील पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून आयटी इंजिनियर ची आत्महत्या; 4 महिन्यापूर्वी झाला होता विवाह

आत्महत्येपूर्वी प्रणवमे चिठ्ठीमध्ये “बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केलं नाही,” असं लिहिलं होतं. आपली अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघावी अशी इच्छा प्रणवने वडिलांकडे बोलू दाखवली होती. त्यामुळेच त्याच्या वडिलांना आपल्या तरुण मुलाच्या अंत्ययात्रेला डीजे लावून लाडक्या मुलाला अखेरचा निरोप दिला.

एवढा मातब्बर खेळाडू असताना त्याने असे आत्महत्येचे पाऊल का उचचले असेल या बाबत त्याच्या कुटूंबासोबत त्याच्या मित्रांच्या मनात देखील शंका आहे.