Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Satara Murder: सातारा जिल्ह्यातील दीपनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अभियंत्याने वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. त्यानंतर आईचाही खून करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला अटक केले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. वडिलांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने, रोहितने वडिलांची हत्या केली. त्यांचे वडिल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मधून सेवानिवृत्त झाले.  हेही वाचा- वऱ्हाड घेवून निघालेल्या गाडीचा सांगलीत भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित श्रीकृष्ण पाटील असे आरोपीचे नाव आहे. श्रीकृष्ण वामनराव पाटील असे मृत वडिलांचे नाव आहे. रोहितने वडिलांचा गळा आवळून आणि नंतर स्क्रू ड्रायव्हरने वार करून खून केले. या प्रकरणी मृताची मुलगी गौरी पाटील हीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. आरोपी रोहित याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. त्याने तब्बल ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. वडिलांनी कर्ज काढून रोहितला पैसे दिले होते. दुप्पट नफा लोकांना परत करू असा आश्वासन दिले. त्यानंतर रोहितने वडिल यांनी पुन्हा पैसे देण्यास नकार दिला आहे.

१५ एप्रिल रोजी रात्री जेवून झोपले. त्यानंतर सकाळी रोहितच्या आईने आरडाओरड केला त्यावेळी रोहित तीचा गळा दाबून हत्या करत होता. त्यानंतर गौरी वडिलांना बोलवण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली मात्र, त्यावेळीस वडिल हे रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडले होते. आईला वाचवण्यासाठी गौरीने प्रयत्न केले त्यानंतर रोहितने तिला देखील मारहाण केली. त्यानंतर गौरी पळून गेली. घटनेची माहिती पोलिसांना दिली.

रोहितने आईला आणि गौरीला धमकी दिली होती. जर या घटनेची माहिती पोलिसांंना दिली तर जीवे मारून टाकेन. पोलिसांना चोरीचा बनाव करून दाखवला परंतु पोलिसांनी कसून चौकशी केली त्यावेळी रोहितने खूनाची कबुली दिली.