Sangli Accident: वऱ्हाड घेवून निघालेल्या गाडीचा सांगलीत भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सांगलीत तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे लग्न सोहळ्यासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. जत मार्गावर नागज जवळील जांभूळवाडी हद्दीत क्रूझर आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमीना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ढालगांवः विजापुर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील जांभुळवाडी फाट्याजवळ चारचाकी गाडीने खाजगी बसला पाठीमागुन धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.  ( Pimpri Chinchwad Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत ऑन ड्युटी पोलिस हवालदाराचा अपघाती मृत्यू)

चारचाकीतील प्रवाशी हे कर्नाटकातील जमखंडी येथून असून ते सावर्डे (ता. तासगाव) येथे लग्नासाठी वऱ्हाड घेवून निघाले होते. घटनेनंतर चारचाकीच्या पुढच्या भागाला आग लागली होती. मात्र स्थानिक लोकांनी पाणी आणून आग नियंत्रणात आणली. या अपघातात  4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांना सांगली मधील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की, चारचाकी गाडी क्रमांक (केए 34 बी 5575) यामधुन 17 प्रवाशी तासगाव तालुक्यातील सावर्डे या गावी लग्नासाठी चालले होते. सावर्डे येथील एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी मुलगी आणण्यासाठी सावर्डे गावातुन एक गाडी पाठविण्यात आली होती लग्नाचे वऱ्हाड घेऊन येताना सोबत चार ते पाच गाड्या होत्या. त्यातील एका गाडीचा आपघात झाला आहे.