Pimpri Chinchwad Accident: पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात एक भीषण अपघात घडला आहे.या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा (Police Constable) मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस खात्यात एकच खलबळ उडाली आहे. ही घटना रावेत पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. दिवसेंदिवस अपघात वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.(हेही वाचा- पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, PSI वर गुन्हा दाखल, पुण्यातील खळबळजनक घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी- चिंचवड शहरात या अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस कर्मचारी ऑन ड्युटीवर होते त्यावेळीस अपघात घडला आणि त्यांचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली आहे. सचिन नरुटे हे हवालदार देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते नाईट ड्युटीसाठी पोलिस ठाण्यात आले होते. दरम्यान त्याचा अपघात दुचाकीला एका वाहनांच्या धडकेमुळे झाला.
रात्रीच्या वेळेस सचिन दुचाकीवर जात होते. रात्री पुनावळ्यावरून देहुरोडच्या दिशेने जात होते. त्यावेळीस अज्ञात वाहनांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंंतर वाहन चालक फरार झाला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी सचिन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिस वाहन चालकाचा शोध घेत आहे. या घटनेनंतर सचिन यांच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस विभागात या घटनेनंतर शोक पसरला आहे.