Mumbai News: तिघांचा तरुणावर जीवघेणा हल्ला, विलेपार्ले येथील घटना
Attack | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai News: विलेपार्ले पूर्व येथे एका चार्टर्ड अकाउंटंटवर तीन अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या कार्यलयातून घरी जात असताना तिघांनी हल्ला केला. या घटनेत गंभीर झखमी झाल्याने त्यांना कुपर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेश शहा (३६) हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. धर्मेश अंधेरी येथील आंबोली येथील रहिवासी आहे. विलेपार्ले येथील पूर्वेतील शुभाश रोड, प्लॅनेट रेसिडेन्सी येथे नायक आणि राणे चार्टर्ड अकाउंटन्सी फर्ममध्ये काम करतात.

मिळालेल्या माहिकीनुसार, रात्रीच्या वेळेस धर्मेश घरी जात असताना, कार्यालयातून बाहेर पडले आणि ऑटोरिक्षा घेण्यासाठी सुभाष रोडवरून गरवारे चौकाकडे एकटेच निघाले. सुभाष रोडवर हॅव मोअर आईस्क्रीम पार्लर येथे पोहोचल्यावर तिघांनी समोरून येऊन धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यातून वाचण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी मदतीसाठी देखील आरडओरड केला. हल्ला होत असताना दिसल्याचे पाहून जमावानी घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांना हकलावून देण्याचे काम जमावांनी केले.  (हेही वाचा- आमदार संजय गायकवाड यांची तरुणाला काठीने बेदम मारहाण)

गंभीर जखमीमुळे त्यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती विलेपार्ले येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे.