Farmer's Protest: कृषी विरोधातील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तान चा हात; रावसाहेब दानवे यांचा अजब दावा
रावसाहेब दानवे (Photo Credit : Facebook)

Farmer's Protest:  दिल्लीत कृषी बिलाच्या विरोधात शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. मात्र केंद्राने आज शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल आज 20 पानांचे एक लिखित प्रस्ताव दिला आहे. याच पार्श्वभुमीवर आता भाजप नेते रावसाहेब दानवे  (Raosaheb Danve) यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल एक विचित्र विधान केले आहे. रावसाहेब दानवे यांनी असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे.

रावसाहेब दानवे यांनी पुढे असे ही म्हटले की, चीन आणि पाकिस्तान यांनीच CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला भडकावले असून शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी केंद्र सराकरची बाजू घेताना सुद्धा दिसून आले. त्यावेळी दानवे जालता जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना बोलत होते.(Farmers' Protest Updates: कृषि बिला संबंधित केंद्राने दिला 20 पानांचा लिखित प्रस्ताव, शेतकऱ्यांच्या नेत्यांकडून चर्चा करुन निर्णय घेतला जाणार)

दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे केंद्र सरकारला सातत्याने सांगत आहे. त्यामुळे जर या मागण्यांवर लवकरच निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा ही आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सिंघु बॉर्डवर अभिनेता दिलजित दोसांज याने शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तो आंदोलनात सहभागी झाला होता. तर काल राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारचा मानकरी बॉक्सर विजेंदर सिंह याने शेतकऱ्यांना समर्थन दिले. त्याने असे म्हटले की, जर सरकारने त्यांचा हा काळा कायदा मागे न घेतल्यास माझा खेलरत्न परत करणार आहे. शेतकऱ्यांच्या फार्म बिलाच्या विरोधातील आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिदास दिला जात आहे.