Farm Laws: दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्याच्या विरोधात जोरदार आंदोलन केले जात आहे. याच दरम्यान, आज शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. पण अण्णा हजारे यांनी त्यांच्या राळेगणसिद्धीत सुद्धा दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीत अण्णा हजारे सुद्धा सहभागी झाले होते. आंदोलक शेतकऱ्यांच्या समस्येवर सरकारने तोडगा काढावा असे ही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.(Farmers Tractor Rally: मेट्रोलाईन बंद, लाठीचार्ज, अश्रुधूर, शेतकरी-दिल्ली पोलीस झटापट; शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यानच्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घटना)
कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी संघर्ष समन्वय समितीसह विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होत कृषी कायद्याला विरोध दर्शवला. तर कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार नसून ते फक्त व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी असल्याचे ही आंदोलकांनी राळेगणसिद्धितील रॅलीत म्हटले.
दरम्यान, ट्रॅक्टर रॅलीपूर्वी दिल्लीला जोडणाऱ्या सर्व सीमा पोलिसांकडून बंद केल्या होत्या. त्याचसोबत गाझियाबाद ते दिल्लीसाठी एक नव्या मार्गदर्शक सुचना ही जाहीर केल्या. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत पोहचण्याचा मार्ग एकूणच बंद झाला होता. पण त्याचवेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. या दोघांमधील वाद ऐवढा वाढला की पोलिसांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. (Kisan Tractor Rally: दिल्लीत आंदोलक शेतकर्यांनी लाल किल्ल्यावर पोहचून रोवला आपला झेंडा!)
तर सेंट्रल दिल्लीमध्ये आज जेव्हा पोलिसांकडून शेतकर्यांना रोखण्यात आले तेव्हा त्यांनी दगडफेक केल्याचा, पोलिसांवर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रकार झाला आहे. पोलिसांनी देखील आंदोलकांना रोखण्यासाठी टिअर गॅस देखील फोडण्यात आला. आजच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने विविध प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत.