Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

पनवेल येथे आयोजित भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बेठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस (Devendra Fadnavis) यांनी कार्यकर्त्यांशी सवांद साधला. या दरम्यान त्यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), त्यांचे सहकारी यांच्यासह भाजपा (BJP) कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी माविआवर (MVA) निशाना साधला, ते म्हणाले, गेली अडीच वर्ष संघर्षात गेली. राज्यात अडीच वर्ष अघोषित आणीबाणी होती. गेले अडीज वर्ष राज्यात विकास थांबला होता. सरकार कोण चालवतंय, ते रामभरोसे होतं. हे पाहून वाटायचं की हे कसलं सरकार आहे? पण राज्यात सत्तांतर झाल आणि आपल सरकार आलं. हे सरकार यावं, ही तर श्रींची इच्छा होती. हे परिवर्तन सत्तेसाठी नाही तर राज्यातील जनतेच्या सुटकेसाठी, त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी हे परिवर्तन आहे. असे फडणवीस म्हणाले.

शिंदे सोबत आहे ती खरी शिवसेना

"राज्यात पहिल्यांदाच सत्तेतील आमदार सत्ता सोडून विरोधी पक्षात येत आहेत. कारण त्यांना माहिती होतं की आपण येथे राहिलो तर संपणार आहोत. कारण ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या अधिपत्याखाली काम करावं लागत होतं हे त्यांना कळलं होतं आणि सरकारमधून मावळे बाहेर पडले. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून अभिनंदन करतो. आता आमच्यासोबत जे आले तीच खरी शिवसेना आहे." असं मत फडणवीसांनी व्यक्त केली आहे. (हे देखील वाचा: CM Eknath Shinde: आम्हाला 50 आमदार आणि दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा, निवडणूक आयोगासमोर आमची बाजू मांडणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

'हे' सरकार खरं जनतेन निवडून दिलेलं सरकार 

मला जेष्ठांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घ्यायला लावली हा माझा सन्मान आहे. मला सरकारमध्ये राहून सरकार चालवा असं त्यांनी सांगितलं. आता मागच्या अडीच वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे त्यामुळे आता हे सरकार खरं जनतेन निवडून दिलेलं सरकार आहे असं म्हणता येईल. या सरकारने याकाळात अनेक समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहे असं फडणवीसांनी सांगितलं आहे.