External Affairs Minister Sushma Swaraj and Former Defense Minister Sharad Pawar | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक 2 (Surgical Strike 2) विषयी परराष्ट्र मंत्री (External Affairs Minister) सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री (Former Defense Minister) तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात सविस्तर चर्चा झाली. शरद पवार यांनी स्वत: ही चर्चा झाल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक 2 झाल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आज सायंकाळी (मंगळवार, 26 फेब्रुवारी) आयोजन केले होते. या बैठकीसाठी मलाही निमंत्रण होते. मात्र, मुंबई विमानतळ आज दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे मला या बैठकीस उपस्थित राहणे कठीण आहे. त्यामुळे या बैठकीबाबतचा सर्व वृत्तांत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला फोनद्वारे ऐकवला.

सुषमा स्वराज आणि शरद पवार यांच्यात काय झाली चर्चा

शरद पवार यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने विराज विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हल्ला केला. हा हल्ला मंगळवारी पहाटे 3 वाजता करण्यात आला. सर्व विरोधी पक्षांना या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली. या हल्ल्यात एकूण किती दहशतवादी ठार झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराला फ्री हॅंड दिल्यामुलेच ही कारवाई होऊ शकली. ही कारवाई करताना भारतीय लष्कराचे कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नाही.

भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो- पवार

दरम्यान, या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतान शरद पवार म्हणाले की, भारतीय लष्कराने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. भारतीय लष्कराचे कौतुक करवे तितके कमी आहे. पाकिस्तानला असा काही धडा शिकविण्याची गरज होती. भारतीय लष्कराने कामगिरी चोख बजावली. देशाच्या संरक्षणासाठी विशिष्ट परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय लष्कराला नेहमीच फ्रि हँड देण्यात आलेला असतो. भारतीय लष्कराने केलेल्या कामगिरीबद्दल देशात जल्लोष साजरा केला जातोय त्याबाबत विचारले असता, पवार म्हणाले की, यात जल्लोष काय करायचा. दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली ते योग्यच आहे. आपण आपले घर सांभाळलेच पाहिजे. पाकिस्तान यापुढे असे काही करेल का असे विचारले असता, पवारांनी सांगितले की, पाकिस्तान असे काही करेल की नाही माहित नाही. पण, दहशतवादाला खतपाणी घालणारे तिथे जे काही घटक आहेत त्यावर पाकिस्तान कसे नियंत्रण ठेवते त्यावर सर्व अवलंबून आहे. (हेही वाचा, होय, भारतीय लष्कराने कारवाई केली, दहशतवाद्यांचा सर्वात मोठा तळ उदद्ध्वस्त केला: भारतीय परराष्ट्र सचिव)

चंद्राबाबू नायडू यांचा पवारांना फोन

दरम्यान, लष्कराने केलेल्या या कारवाईबद्दल विरोधी पक्षांची काय भूमिका आहे असे विचारता पवारांनी सांगितले की, देशावरील संकट दूर करण्यासाठी सर्व पक्ष एकत्रच असतात. विरोधी पक्षांनीही या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांनाही लष्कराच्या कामगिरीबाबत अभिमान आहे. काही वेळापूर्वी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मला फोन आला होता. त्यांनीही मला सांगितले की, सर्जिकल स्ट्राईक 2 बद्दल माहिती देणारी बैठक आताच पार पडली. या कारवाईबाबत आपल्यालाही आनंद होत असून, आपण लष्काराच्या कारवाईसोबत आहोत, असे नायडू यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले.