Foreign Secretary Vijay Gokhale Press Conference on Surgical Strikes 2 | (Photo Credits: Twitter)

पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने जोरदार बदला घेतला. भारतीय लष्कराच्या 12 विमानांनी पाकिस्तानी हद्दीत (POK)  जाऊन दहशतवादी तळ उदद्ध्वस्त केले. या कारवाईबाबत प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले होते. भारतीय परराष्ट्र सचिव विजय गोखले (Foreign Secretary Vijay Gokhale) यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याच्या वृत्ताची अधिकृत पुष्टी केली. तसेच, या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली.

ही माहिती देताना विजय गोखले (Vijay Gokhale) यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये ( Pakistan) असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सर्वात मोठ्या दहशतवादी तळावर भारतीय लष्कराच्या हवाई दलाने हल्ला केला. या कारवाईत जैश मोहम्मदच्या अनेक दहशतवादी आणि म्होरक्यांना कंठस्नान घातले. महत्त्वाचे म्हणजे या कारवाईत कोणत्याही प्रकारे नागरी वस्त्यांवर हल्ला केला नाही. बालकोट येथील दहशतवादी तळावर हा हल्ला करण्यात आला. असेही परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या वेळी स्पष्ट केले.

भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांची कंट्रोल रुम उदद्ध्वस्त केली. रात्रीच्या अंधारात पहाटे 3 वाजता ही कारवाई केली. दरम्यान, गेल्या काही तासांपासून भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) विमाने सीमारेषा (Line of Control) ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत (पाकव्याप्त काश्मीर) घुसत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. (हेही वाचा, Surgical Strike 2: पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या12 व्या दिवशी लष्कराने बदला घेतलेल्या 12 मिराज विमानाची खास वैशिष्ट्य)

दरम्यान, काल रात्रीपासून पाकिस्तान (Pakistan) सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय हद्दीच्या दिशेने गोळीबार आणि मोर्टार डागत आहे. भारताकडूनही पाकिस्तानच्या या नापाक हरकतींना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताकडून प्रत्युत्तर येताच पाकिस्तानने कांगावा करत भारतीय हवाई दलाची विमाने LOC पार करुन POK मध्ये घुसल्याचा आरोप केला आहे.