Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

Ex-Serviceman Letter to CM Eknath Shinde: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील सालवडगावपासून अवघ्या 2 किमी अंतरावर असलेले हनुमानवस्ती हे 350 लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. मात्र, गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावातील माजी सैनिक दत्तू भापकर (Dattu Bhapkar) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून हेलिकॉप्टर खरेदीसाठी अनुदान मागितलं. पूर्वी या गावात जाण्यासाठी नाल्यातून रस्ता असायचा. मात्र, या ओढ्यावर बंधारे बांधल्याने रस्ता बंद झाला आहे.

शेवगाव तालुक्यातील सालवडगावपासून 2 किमी अंतरावर असलेल्या हनुमानवस्ती या विखुरलेल्या वस्तीमध्ये सुमारे 350 लोक राहतात. जुन्या नाल्यातून ग्रामस्थांसाठी रस्ता असून त्यावर बंधारेही बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम बंद पडले. तत्कालीन तहसीलदार पगिरे यांनी रस्त्यांची पाहणी करून काम सुरू होणार होते. मात्र, पावसामुळे काम सुरू होऊ शकले नाही. तसेच नाल्यावरही अतिक्रमण झाले आहे. (हेही वाचा - Mercedes Tow Auto: पुणेकरांचा नाद खुळा ! मर्सिडीजने रिक्षेवाल्याला केलं Tow; पहा व्हिडीओ)

रस्त्याची अवस्था वर्षानुवर्षे तशीच असल्याने सेवानिवृत्त सैनिकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हेलिकॉप्टरसाठी कर्जाची मागणी केली. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. (हेही वाचा -Mumbai to San Francisco थेट विमानसेवेमुळे औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

दरम्यान, पावसाळ्यात मुलं आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच शाळेत जाऊ शकता. यासंदर्भात बोलताना माजी सैनिक दत्तू भापकर म्हणाले की, राज्यात एकीकडे समृद्धी महामार्ग केला जातोय तर दुसरीकडे केवळ 2 किमीचा रस्ता देखील सरकारला करता येत नाही. केवळ रस्त्या उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. भापकर यांच्या मागणीबाबत संबधित विभागाकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.