काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल (Rashmi Bagal) यांचा आज शिवसेनेत प्रवेश झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर निर्मला गावित आणि रश्मी बागल यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मोठी गळती लागली आहे. यातच काँग्रेस पक्षाला निर्मला गावित यांच्या रुपात आणखी एक मोठा धक्का लागला आहे. काही दिवसांपासून निर्मला गावित त्यांच्या हातावर शिवबंधन बांधणार असल्याचे चर्चा रंगली होती. निर्मला गावित यांनी मंगळवारी दुपारी आमदारकीचा राजीनामा देऊन या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.
गावित घराणे गांधी घराण्यांनी एकनिष्ठ, मात्र जिल्ह्याच्या राजकारांमुळे त्यांचे वडील माणिकराव नाराज होते. विधानसभेत त्यांच्या भावाला उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु काँग्रेस पक्षाने यावर कोणतीही प्रतिक्रिया आणि शब्द दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. आज बुधवारी दुपारी निर्मला गावित यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
रश्मी बागल यांचा शिवसेना प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या @BagalRashmi जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/5CeOXl8KMN
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 21, 2019
निर्मला गावित यांचा पक्ष प्रवेश
इगतपुरी मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/gg46huJqne
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 21, 2019
भाजपमध्ये सामील होणाऱ्या पुढच्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वात जवळचे समजले जाणारे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि रामराजे निंबाळकर यांचा समवेश होण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकतेच खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली, त्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे.