A.M Foundation: अनिल महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ए.एम फाउंडेशनची स्थापना; अन्याय ग्रस्तांच्या मदतीला जाणार धावून
Establishment of AM Foundation

विविध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक,गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे चेअरमन अनिल महाजन (Anil Mahajan) यांच्या 35 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज (16 एप्रिल 2021) ए. एम फाउंडेशनची (AM Foundation) स्थापना करण्यात आली आहे. या फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या हस्ते पार पडला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे आणि रामदास आठवले यांनी ए. एम फाउंडेशनच्या भावी वाटचालीसाठी अनिल महाजन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

देशात व राज्यात जेथे जेथे अन्याय होत असेल अशा ठिकाणी अन्याय ग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे, असा ए.एम फाउंडेशनचा उद्देश असणार आहे. जात-धर्म-समाज न बघता एक माणूस म्हणून सर्वांना मदतीचा हात देणे हे या फाऊंडेशनचे काम असणार आहे. या फाउंडेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर असणार आहे. तसेच देशातील चांगले काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे. हे देखील वाचा- महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून Entrepreneurship Cell ची स्थापना

अनिल महाजन यांचा गोतावळा, सर्वपक्षीय मित्र परिवार, कार्यकर्ते, पदाधिकारी देशातील प्रत्येक राज्यात आहेत. त्यामुळे या फाऊंडेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर सुरू असणार आहे. सर्व जाती धर्मातील व्यक्तींना तरुणांना महिलांना या फाउंडेशनमध्ये काम करता येणार आहे. प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, राज्य या फाऊंडेशनचे अधिकृतरीत्या संघटन असणार आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. देशातील चांगले काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाईल. देशभरातील प्रत्येक नागरिकांना या फाउंडेशनचा सभासद होता येणार आहे.

देशावर येणारे कोणतेही संकट किंवा आपत्तीमध्ये संकट निवारण करण्यासाठी एम फाउंडेशनचा सहभाग असणार आहे. या संघटनेचे सदस्यत्व तूर्तास मोफत असणार आहे. ए. एम फाउंडेशनचा पूर्ण अर्थ अनिल महाजन फाउंडेशन, असे आहे. ए. एम फाउंडेशनचे मुख्य कार्यालय मुंबईत असणार आहे.