महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून Entrepreneurship Cell ची स्थापना
Nawab Malik (Photo Credits: Twitter)

महिलांसाठी विशेष Entrepreneurship Cell स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) केली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग अधिकाधिक वाढवणे हा या सेलचा प्रमुख उद्देश आहे. राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या नाविण्यपूर्ण उद्योजकांच्या सोसायटी (Maharashtra State Innovation Society) अंतर्गत या सेलची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत नवीन महिला उद्योजकांना पेटन्स फायलिंग करण्यासाठी आणि लॅब टेस्ट करण्यासाठी या सेलद्वारे आर्थिक साहाय्य सुद्धा मिळेल.

उद्योजक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थीनींसाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये Girl-Student Entrepreneurship Clubs अंतर्गत योग्य ट्रेनिंग देण्यात येईल. महिला उद्योजकांसाठी विविध इनक्यूबेटर्स बनवण्यात येतील आणि भविष्यामध्ये या इनक्यूबेटरच्या प्रगतीकडे लक्ष देण्यात येईल. सर्व महिला उद्योजकांना आर्थिक पाठबळ सुद्धा पुरवण्यात येईल. (Police Pre-Recruitment Training: अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण; नवाब मलिक यांची माहिती)

सर्व उद्योग क्षेत्रामध्ये आणि पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग अधिकाधिक व्हावा यासाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. Entrepreneurship Cell सुरु करणे हे या विविध योजनांमधील पहिले पाऊल आहे.

गेल्या 6 महिन्यामध्ये राज्यामध्ये नवीन उद्योजकांना 1 लाख कोटींची गुंतवणूक मिळाल्यामुळे Entrepreneurship Cell स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कौशल विकास विभागाने हा सेल निर्माण करण्यासाठी 14 सदस्यांची समिती नेमली होती. या समितीमध्ये UN, UNESCO, UNICEF आणि SNDT मेन युनिव्हर्सिटीच्या महिला प्रतिनीधींचा समावेश आहे.

कौशल्य विकास विभागाने जारी केलेल्या GR नुसार, देशामध्ये केवळ 14% महिला उद्योजक आहेत. 2021 पासून अर्थसंकल्पातील 30% रक्कम महिला उद्योजकांसाठी राखीव ठेवण्यात येईल.