ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तोलुगू कवी वरवरा राव (Varavara Rao) यांच्या प्रकृतीचा आणि वैद्यकीय स्थितीचा संपूर्ण अहवाल सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नानावटी सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलला (Superspeciality Nanavati Hospital ) दिले आहेत. न्यायमूर्ती आरडी धानुका ( RD Dhanuka ) आणि न्यायमूर्ती व्ही.जी. बिष्ट ( VG Bisht ) यांच्या खंडपीठाने येत्या तीन दिवसांत हा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 80 वर्षीय कवी वरवरा राव (Varavara Rao) हे सध्या कारागृहात आहेत. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात प्रोत्साहन दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) करत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप नोंदवला आहे. त्याबाबतही आक्षेपाबाबतचा अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयासमोर ठेवा असे आदेश न्यायालयाने एनआयएला दिले आहेत. सुधा भारद्वाज यांनी वैद्यकीय कारणांसाठी जामीन मागितला आहे. (हेही वाचा, Varavara Rao Health Updates: कोविड 19 ची लागण झालेल्या वरावरा राव यांना Neurological Problem सुद्धा; सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये स्पेशॅलिस्ट डॉक्टरांकडून उपचार)
Bombay HC directs hospital to submit report on health condition of jailed poet-activist #VaravaraRao
— Press Trust of India (@PTI_News) July 28, 2020
दरम्यान, न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या परिस्थितीत याचिकाकर्त्याची चिंता दोन पटीने आहे. एक म्हणजे याचिकाकर्त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सध्या विले पार्ले येथील नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या याचिकाकर्त्याला भेटण्याची परवानगी नाही. दुसरे असे की याचिकाकर्त्याच्या प्रकृतीची सद्यस्थिती कुटुंबातील सदस्यांना सांगण्यात आली नाही.