केंद्रीय निवडणूक आयोगाने 3 डिसेंबर दिवशी कॉंग्रेस शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये ईव्हीएम हॅक झाल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले यांनी याबद्दल पत्र लिहले आहे. दरम्यान या निवडणूक निकालात महायुतीला एकतर्फी आणि मोठ्या प्रमाणात मिळालेल्या यशाबद्दल अनेकांनी तक्रारी देखील केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने कॉंग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निवडणूक निकालामध्ये सारी प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडल्याचं म्हटलं आहे. मात्र तरीही पक्षाच्या मनात काही शंका असल्यास त्यांचा विचार केला जाईल असं म्हटलं आहे. मतदारांच्या मतदानाच्या आकडेवारीच्या मुद्द्याला उत्तर देताना, निवडणूक आयोगाने सांगितले की त्यात कोणतीही तफावत नाही. डेटा सर्व उमेदवारांकडे मतदान केंद्रनिहाय उपलब्ध आहे आणि तो पडताळला जाऊ शकतो. 'Pet Dog’ Remark: भाई जगताप यांच्या निवडणूक आयोगाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा भाजपा कडून निषेध; किरीट सोमय्यांकडून तक्रार दाखल.
संध्याकाळी 5 नंतर मतदान डेटा आणि अंतिम मतदारांमधील फरक हे प्रक्रियात्मक प्राधान्यांमुळे होते, कारण अधिकारी मतदार मतदानाचा डेटा अद्ययावत करण्यापूर्वी मतदानाच्या जवळ अनेक महत्त्वाची कामं पार पाडतात, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.