महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे एकतर्फी निकाल पाहून विरोधकांनी त्यावर आक्षेप घेत ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. अशात निवडणूक आयोगावर टीका करताना कॉंग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांची जीभ घसरली आहे. 'निवडणूक आयोग हा पंतप्रधान मोदी यांच्या घराबाहेर बसलेला कुत्रा आहे.' अशी टीपण्णी त्यांनी केली आहे. आता या वक्तव्यावर टीका होत असतानाही भाई जगताप यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता भाजपा देखील आक्रमक झाली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कॉंग्रेसच्या भाई जगतापांविरूद्ध पोलिसांत आणि निवडणूक आयोगामध्ये तक्रार नोंदवली आहे. निवडणूक आयोगाबद्दल अशा शब्दांत टीपण्णी योग्य नाही. आमदार भाई जगतापांविरूद्ध कारवाई आवश्यक आहे. त्यामुळे तक्रार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या यांची पोस्ट
I filled complaint with Election Commission & Police Commissioner Mumbai to take action against Congress Bhai Jagtap for abusing Election Commission
निवडणूक आयोगाल कुत्रा शिवी बद्दल काँग्रेस भाई जगताप वर कारवाई करण्यासाठी मी निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तां कडे तक्रार केली आहे pic.twitter.com/TZpyfN4jLy
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 30, 2024
Election Commission आणि Mumbai Police Commissioner यांना कठोर कारवाई करण्याचं आवाहन किरीट सोमय्या यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर अचानक मतदानात 7.83 टक्के वाढ झाल्याचा प्रश्न विचारला आहे आणि संभाव्य फेरफार झाल्याचं सुचवलं आहे.