Kopari Bridge: कोपरी पुलाच्या दोन मार्गिकांचे आज एकनाथ शिंदे हस्ते लोकार्पण
कोपरी पुलाच्या नव्या मार्गिकांचे लोकार्पण (Photo Credits: Twitter)

ठाणे (Thane) येथील कोपरी पुलाच्या (Kopari Bridge) पहिल्या टप्प्यातील दोन मार्गिकांचे आज अखेर लोकार्पण करण्यात आले. बांधकाम होऊन देखील अनेक महिने या मार्गिकांचे उद्घाटन झाले नव्हते. आज अखेर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ठाणे (Thane) आणि मुलुंड (Mulund) या दोन शहरांना जोडणारा हा पूल असून यामुळे शहरांमधील वाहतूक कोंडी कमी होईल. यामुळे नक्कीच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, खासदार राजन विचारे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक, आमदार संजय केळकर, माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे ट्विट्स:

(हे ही वाचा: Eknath Shinde On Narayan Rane: एकनाथ शिंदे यांनी नारायण राणेंचा 'शिवसेनेत कंटाळल्या'चा दावा फेटाळत दिलं हे स्पष्टीकरण)

या पुलावरील दोन्ही बाजूच्या प्रत्येकी दोन अशा चार मार्गिका सुरू केल्यानंतर लवकरच मधील चार मार्गिकांचे काम देखील रेल्वे आणि एमएमआरडीए हाती घेणार आहे. तसंच हे काम वर्षभरात पूर्ण करुन दोन्ही बाजूच्या चार अशा एकूण आठ मार्गिका कार्यान्वित करण्याचे उद्दीष्ट असल्याचे शिंदे यांनी सांगितले.