Eknath Khadse Joins NCP: शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Eknath Khadse | (File Photo)

भाजप (BJP) मधून राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. 21 ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  त्यानंतर त्यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत NCP मध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंवत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच खडसे यांना मंत्रीपद मिळणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु, NCP एकनाथ खडसे यांना कोणतं पद देणार की केवळ भाजप विरुद्ध खडसेंचा वापर करणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल. काही वेळापूर्वीच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक पार पडली. त्यामुळे आव्हाडांचे गृहनिर्माण मंत्री पद खडसेंना दिले जाईल, अशा चर्चांना उधाण आले आहे.  (Eknath Khadse यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशावर CM Uddhav Thackeray यांची पहिली प्रतिक्रीया; पहा काय म्हणाले)

पक्ष, पक्ष संघटना किंवा इतर कोणावरही नाराज नसून केवळ देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याने भाजप सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. यापूर्वी अनेकदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर उघडपणे टीका केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर नाराज असलेल्या खडसेंनी अखेर पक्षातून काढता पाय घेतला. (Why is Eknath Khadse joining NCP? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रवेश का? एकनाथ खडसे यांनी दिले उत्तर)

मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून खडसे नाराज होते. परंतु, मी स्वत: त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची नाराजी दूर करण्यास मी अयशस्वी ठरलो, असे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद नाकारल्यामुळे खडसे मुख्यमंत्रीपदाला मुकले असेही ते म्हणाले.