राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ऐन निवडणुक हंगामात मोठा धक्का बसल्याचे वृत्त आहे. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रु नुकसानी खटल्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) स्थगिती दिल्याचे समजते.
अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमे आणि राजकीय वरतुळात एनकाथ खडसे यांच्याबद्दल जोरदार चर्चा रंगली होती. भोसरी येथील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. दरम्यान, एकनाथ खडसे समर्थकांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता.
दरम्यान खडसे समर्थकांनी दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या तब्बल 32 पैकी 21 खटल्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तर, उर्वरीत 11 खटल्यांसंदर्भात दमानिया यांनी स्वतंत्र याचिका दाखल करवी, असे निर्देश न्यायायलायने दिले आहेत.