Sunni Ruet Hilal committee ने आज शव्वाल चंद्रकोरीचे दर्शन न झाल्याने मुंबई (Eid In Mumbai) मध्ये यंदा 25 मे दिवशी ईद-उल-फित्र (Eid-al-Fitr) साजरी केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी चंद्रदर्शनाचा प्रयत्न केला गेला, मात्र चंद्र न दिसल्याने 30 दिवसांचे रोझे पूर्ण करून शेवटी 25 मे सोमवारीच ईद साजरी केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. काही वेळापूर्वी दिल्लीच्या जामा मस्जिदीचे (Jama Masjid) शाही इमाम सईद अहमद बुखारी (Syed Ahmed Bukhari) यांनी सुद्धा मुस्लिम बांधवांना याबाबत माहिती दिली होती. तसेच 25 मे रोजी सण साजरा करताना लॉकडाऊनच्या (Lockdown) नियमाचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहनही करण्यात आले होते. ईदचा सण साजरा करताना आपली काळजी घेणे आवश्यक आहे. दरवर्षी पेक्षा यंदा ईद वेगळी असणार आहे, कोणीही यावेळी इतरांना आलिंगन देऊन, हात मिळवून शुभेच्छा देण्याचे प्रकार करू नयेत, आपल्याला सरकारच्या निर्णयाचे पालन करायचे आहे असे बुखारी यांनी म्हंटले आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दिल्ली मध्ये सुद्धा चंद्र दर्शन न झाल्याने मुस्लिम बांधव 25 मे लाच ईद साजरी करतील. तर कर्नाटक आणि केरळ मध्ये उद्या ईद साजरी केली जाणार आहे. Happy Ramadan Eid 2020 Messages: रमजान ईद मुबारक Wishes, Greetings, SMS, Images, च्या माध्यमातून Facebook, WhatsApp Status वर शुभेच्छा देत द्विगुणित करा 'या' सणाचा आनंद!
पहा ट्विट
#EidUlFitr to be celebrated on May 25 as moon could not be sighted today. It's important that we take precautions&maintain social distancing. We should stay away from shaking hands & hugging. We should follow govt's guidelines: Delhi's Jama Masjid's Shahi Imam, Syed Ahmed Bukhari pic.twitter.com/QWyN7yxt3D
— ANI (@ANI) May 23, 2020
रमजानच्या महिन्यातील ईद हा मुस्लिम बांधवांसाठी एक महत्वाचा सण आहे. 30 दिवसांच्या रोजानंतर चंद्र दर्शनानंतर ईदचा पवित्र सण साजरा केला जातो. ईदची तारीख चंद्रानुसार ठरविली जाते. यंदा 24 व 25 मे या दोन दिवसांपैकी नक्की ईद कधी साजरी करायची याबाबात संभ्रम होता, आता हिलाल कमिटीतर्फे 25 मे वर शिक्कामोर्तब करून हा प्रश्न दूर केला गेला आहे.