Happy Ramadan Eid 2020 Messages: रमजान ईद मुबारक Wishes, Greetings, SMS, Images, च्या माध्यमातून Facebook, WhatsApp Status वर शुभेच्छा देत द्विगुणित करा 'या' सणाचा आनंद!
Ramadan Eid 2020 Messages | File Image

Ramadan Eid 2020 Marathi Messages: मुस्लिम धर्मियांसाठी महत्वाचा सण म्हणजे रमजान ईद  (Ramadan Eid) यंदा 24 - 25 मे रोजी पार पडणार आहे, यंदा 23 एप्रिल पासून रमजानचा मासारंभ झाला होता. या काळात मुस्लिम बांधव अल्लाह कडे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांची माफी मागतात, या महिन्याभरात रोझा म्हणजेच उपवासाचे विशेष महत्व असते. दिवसभर कडक उपवास आणि दिवसातून पाच वेळा नमाज पठण करून हा महिना साजरा केला जातो. रमजान ईद च्या निमित्त कुटुंबीय, नातेवाईक मित्र मंडळींसोबत सण साजरा करण्याची पध्दत आहे मात्र साहजिकच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे एकत्र येणे शक्य होणार नाही अशावेळी निदान ऑनलाईन माध्यमातून तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. रमजान ईद सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या काही Messages, Wishes, Greetings, SMS, Images, च्या माध्यमातून Facebook, WhatsApp Status वर तुम्ही शुभेच्छा देऊ शकाल. रमजान ईदच्या हिंदी शुभेच्छापत्रांंसाठी इथे क्लिक करा.

विशेष म्हणजे खाली देण्यात आलेले रमजान ईद मुबारक संदेश हे मराठीतून आहेत. मुस्लिम बांधवांना त्यांच्या मराठी मित्रमंडळींकडून खास मराठीतून या शुभेच्छा वाचून नक्कीच आणखीन स्पेशल फील करून देता येईल. यासाठी ही शुभेच्छापत्र तुमच्या सोशल मीडियावरून नक्की शेअर करा.

रमजान ईद मुबारक संदेश

अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,

हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…

आमीन!

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा

ईद मुबारक

Ramadan Eid 2020 Messages | File Image

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा

ईद मुबारक

Ramadan Eid 2020 Messages | File Image

ईद घेऊन येई आनंद

जोडू मनामनांचे बंध

सणाचा हा दिवस खास

ईद मुबारक तुम्हा सर्वांस

रमजान ईद मुबारक!

Ramadan Eid 2020 Messages | File Image

धर्म, जात यापेक्षाही मोठी

असते शक्ती माणुसकीची...

एकमेकांची गळाभेट घेऊन

शुभेच्छा रमजान ईद ची

ईद मुबारक

Ramadan Eid 2020 Messages | File Image

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो

ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

रमजान मुबारक! ईद मुबारक!

Ramadan Eid 2020 Messages | File Image

रमजान ईदला 'ईद-उल्-फित्र' देखील म्हणतात. फित्र या शब्दाचा मतितार्थ दान करणे असे सुद्धा सांगतो  म्हणून या दिवशी  ईद निमित्त धान्य, वस्त्र इत्यादी दान केले जाते. तुम्हालाही यंदा शक्य असल्यास या लॉक डाऊन काळात गरजूंना दान करा. घराबाहेर जाणे शक्य नसले तरी घरातच राहून आपल्या कुटुंबियांसोबत राहून सण साजरा करा, तुमच्या मित्रपरिवाराला शुभेच्छा द्या, नातेवाईकांशी किंवा दूर असलेल्या प्रियजनांशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून गप्पा मारा. हा काळ कठीण आहे पण त्यामुळे तुमचा उत्साह कमी करून घेण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला सर्वांना लेटेस्टली परिवाराकडून सुद्धा ईद मुबारक!