महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अंड्यांच्ये उत्पादन घटले (Eggs Shortage In Maharashtra) आहे. परिणामी महाराष्ट्रात प्रतिदिन तब्बल 1 कोटी अंड्यांची कमतरता जाणवत आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग (Maharashtra Animal Husbandry Departmen) अंडी उत्पादन वाढविण्यासाठी योजना आखत आहे. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे (Dr. Dhananjay Parkale) यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राची नियमीत अंडी वापराचे प्रमाण प्रतिदिन साधारण 2.25 कोटींपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत विचार करु पाहता राज्यात दररोज 1 कोटी अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तात पुढे म्हटले की, महाराष्ट्रातील अंडी टंचाईवर मात करण्यााठी सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू येथून अंडी खरेदी केली जात आहेत. त्यामुळे राज्यात अंडी उत्पन्न वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्याला 21,000 रुपयांच्या अनुदानित दराने 50 पांढऱ्या लेघॉर्न कोंबड्या आणि 1,000 पिंजरे देण्याची योजना आखत आहे, अशी माहिती धनंजय परकाळे यांनी दिली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने राज्यातील अंडी उत्पन्न वाढविण्यासंदर्भातील एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. (हेही वाचा, अंबरनाथमध्ये अंडी चोरांचा हैदोस, चक्क ट्रकच पळवला)
दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह औरंगाबाद आणि राज्यातील विविध शहरांमध्ये अंड्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. एकट्या औरंगाबाद शहरात 100 अंड्यांची किंमत 575 रुपये आहे. दोन महिन्यांहून अधिक काळापासून ही किंमत 500 रुपयांच्या (100 अंडी) वर आहे," असे घाऊक व्यापारी अब्दुल वाहिद शाह यांनी सांगितले.