अंबरनाथमध्ये अंडी चोरांचा हैदोस, चक्क ट्रकच पळवला
अंबरनाथमध्ये चोरांनी पैशांची चोरी न करता चक्क अंड्यांचा ट्रक पळवल्याची विचित्र घटना घडली आहे.
अंबरनाथमध्ये चोरांनी पैशांची चोरी न करता चक्क अंड्यांचा ट्रक पळवल्याची विचित्र घटना घडली आहे. तर या पळवलेल्या ट्रकमध्ये जवळजवळ पाच लाख रुपयांची अंडी असल्याचे सांगितले जात आहे.
कर्नाटकच्या बिदर भागातून एक अंड्यांनी भरलेला ट्रक अंबरनाथच्या दिशेने येत होता. तर अंबरनाथ येथे असलेल्या महाराष्ट्र एग्ज सेंटरमध्ये ही सर्व अंडी पोहचवायची होती. काही चोरट्यांनी रात्री तीन वाजताच्या सुमारास तेथील टी सर्कल नजीक या ट्रकला अडवले. त्याचबरोबर ट्रक चालकास आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण करुन टिटवाळ्याच्या एका गावाजवळील जंगलात नेऊन सोडले. तर या पीडित बाप लेकाकडून पैसे आणि मोबाईल पळवला आहे.
या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. तसेच ट्रकमध्ये 1 लाख 41 हजार अंड्यांचे नग असल्याचे या पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले आहे. तर अद्याप या चोरट्यांचा शोध लागला नसून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2018 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

