ED च्या Money Laundering  प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर; इतर  प्रकरणांमुळे मुक्काम मात्र कोठडीतच
Sachin Waze (Photo Credits: ANI)

ईडी (ED) ने मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये (Money Laundering Case)  अटकेत घेतलेल्या सचिन वाझेला (Sachin Vaze)  त्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाला आहे. सचिन वाझे हा मुंबई पोलिस खात्यातील बडतर्फ अधिकारी आहे. CRPC कलम 88 अंतर्गत त्याने जामीन अर्ज दाखला केला होता. ईडीचा याला विरोध असला तरीही आता जामीन मंजूर झाला आहे. परंतू सचिन वाझेवर इतर प्रकरणं देखील असल्याने त्याचा तुरूंगातील मुक्काम तसाच राहणार आहे.

ईडीकडून सचिन वाझेला जामीन मिळाल्यास तो पुराव्याशी छेडछाड करू शकतो असं सांगून विरोध दर्शवण्यात आला होता. 15 नोव्हेंबरला या प्रकरणी युक्तिवाद पूर्ण झाला होता पण निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

सचिन वाझेच्या विरूद्ध ईडी प्रमाणेच सीबीआय कडून आणि एनआयए कडूनही प्रत्येकी 1 प्रकरण निलंबित आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे हा एका कथित भ्रष्टाचार प्रकरणामध्येही अडकलेला आहे. त्यामध्ये आता सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे. या प्रकरणात त्याने महाविकास आघाडी सरकार मधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध असलेली माहिती देण्याची त्याने तयारी दर्शवली आहे. नक्की वाचा: Parambir Singh on Maharashtra Government: परमबीर सिंग यांचा महाराष्ट्र सरकारवर खळबळजनक आरोप; CBI ला म्हणाले, सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी टाकण्यात आला होता दबाव .

भारतातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अ‍ॅंटिलिया बंगल्याबाहेत जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ ठेवण्याचा, या गाडीचा मालक मनसुख हिरेन याच्या मृत्यूप्रकरणी देखील सचिन वाझे वर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सीबीआयने भ्र्ष्ट्राचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख यांना अटक केली आहे. सचिन वाझेने केलेल्या आरोपामध्ये आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा करत असल्याचं म्हटलं आहे. भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि ख्वाजा युनुस कथित कोठडी मृत्यू प्रकरणातही सचिन वाझे आरोपी आहे.