Lockdown in Solapur: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सोलापूरात 8 ते 15 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही राहणार बंद
Lockdown in Sangli | (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात लॉकडाऊनचे कडक निर्बंध घोषित करण्यात आले असून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान सोलापूरात (Lockdown in Solapur) कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याकारणाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या 8 मेपासून रात्री 8 वाजल्यापासून 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नवे निर्बंध जाहीर केले. हे निर्बंध पाळणे सोलापूरकरांसाठी बंधनकारक असणार आहे.हेदेखील वाचा- Covid-19 Vaccination in Mumbai: BMC खुल्या मैदानात सुरु करणार drive-in लसीकरण केंद्र; येथे पहा संपूर्ण यादी

सोलापूरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 19 हजार 670 वर पोहोचली असून आतापर्यंत 2862 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात आज 62,194 नवे कोविड-19 रुग्ण आढळून आले असून 853 मृतांची नोंद झाली आहे. 63,842 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

यातच एक दिलासादायक गोष्ट म्हणजे कोविड-19 लसीकरणात (Covid-19 Vaccination) महाराष्ट्र (Maharashtra) अव्वल ठरला आहे. केवळ लसींचे सर्वाधिक डोस देण्यात नाही तर लसींचे दोन्ही डोस देऊन नागरिकांना सुरक्षित करण्यात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. आतापर्यंत राज्यात 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 लसींचे डोस देण्यात आले असून त्यापैकी 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, अशी माहिती अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी दिली आहे.