Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

दादर (Dadar) परिसरातील इंदू मिल (Indu Mill) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाचे काम 2 वर्षात पूर्ण करु, असे अश्वासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लागेल तो निधी देणार, असेही अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्टोबर 2015 मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 एप्रिल 2020 च्या अगोदर बाबासाहेबांच्या स्मारकाची उभारणी केली जाणार, असे अश्वासन दिले होते.

नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान अजित पवार यांनी इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात विधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डॉ.बाबासाहेब यांचे इंदू मिल येथील स्मारकाचे काम 2 वर्षात पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी लागेल निधी मंजूर करुन देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, स्मारकासाठी हवे असलेल्या परवाणग्या मिळवू, असे अजित पवार म्हणाले आहे. तसेच शेतकऱ्यांचा मुद्दा मांडल्यानंतर अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जिल्हा अधिकाऱ्याशी बोलाणार असल्याचे अजित पवार त्यावेळी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- NCP नेता डी.पी. त्रिपाठी यांचे निधन; दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्वास

Bhima Koregaon 202nd Anniversary:  भीमा कोरेगाव लढाई, इतिहास, विजय स्तंभ आणि दलितांचे शौर्य : ठळक मुद्दे Watch Video 

कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारीला त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर अजित पवार यांनी बुधवारी कोरेगाव भीमा येथील विजयी स्तंभाला अभिवादन केले होते. दरम्यान, नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते.