NCP नेता डी.पी. त्रिपाठी यांचे निधन; दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्वास
NCP Leader DP Tripathi (Photo Credits: ANI)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेल्या डी. पी त्रिपाठी (D. P. Tripathi) यांचे दिल्लीत निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी दीर्घ आजारपणामध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दरम्यान मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे उपचारामध्ये डी.पी, त्रिपाठी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डी.पी त्रिपाठी हे मूळचे उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरचे आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला कॉंग्रेस पक्षामधून सुरूवात झाली. मात्र सोनिया गांधी यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर त्यांनी एनसीपी पक्षामध्ये प्रवेश केला. पुढे ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महासचिव म्हणून काम पाहत होते.

सुप्रिया सुळे यांची श्रद्धांजली

वयाच्या 16 व्या वर्षी राजकारणात आलेल्या त्रिपाठी यांनी सुरूवातीला जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी संघटेनेचे अध्यक्षपद भूषवले . नंतर इलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1999 साली त्यांनी एनसीपीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते प्रवक्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बनले.